'मुस्लिम समाजाला शुक्रवारी नमाज पढण्यासाठी ब्रेक मिळावा'

मुंबई - राज्य सरकारच्या अखत्यारीत काम करणाऱ्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना शुक्रवारी दुपारी नमाज पढण्यासाठी 90 मिनिटांचा ब्रेक देण्यात यावा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ आमदार अबू आझमी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतील याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अबू आझमींच्या या मागणीविरोधात जोरदार टीका केली. ते म्हणाले, समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशमध्ये आहे, त्यामुळे अबू आझमींनी तिथे जाऊन ही मागणी करावी.

पुढील बातमी
इतर बातम्या