सर म्हणतात युती अभंग!

दादर - नगरसेवक ते लोकसभाध्यक्ष अशी अनेक पदं भूषविलेलं शिवसेनेचे ज्येष्ठ नेता मनोहर जोशी 80 वर्षांचे झालेयत. राजकारणाचा दांडगा अभ्यास असलेल्या जोशी सरांना आजही युती अबाधित रहावी म्हणून उद्धव ठाकरे आणि देेवेंद्र फडणवीस यांच्यातील दुवा बनावं लागलंय. हे स्वतः मनोहर जोशी मान्य करतायत हे महत्त्वाचं.

जीवन कसे जगावे? हा प्रश्न इतरांना पडू शकतो. मात्र अर्धीअधिक हयात शिवसेनेसाठी खर्च करणा-या आणि विविध पदं उपभोगण्याची संधी लाभलेल्या मनोहर जोशींना केवळ हा प्रश्नच पडत नाही. तर त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तरही आहे. याच शीर्षकाच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हे ठाऊक नसेल तरच नवल!

एकंदर मनोहर जोशी यांना शिवसेना-भाजपा युती टिकावी असं वाटत असलं तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना, म्हणजेच सरांच्या विद्यार्थ्यांनाही तसंच वाटत असेल का? बहुतेक याचंही उत्तर जोशीसरांकडेच असावं.

पुढील बातमी
इतर बातम्या