Live Updates : महाराष्ट्र बंद, मुंबईत ठिय्या

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा समाजाच्या संघटनांनी गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. असं असलं तरी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतला आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात केवळ ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या बंदच्या पार्श्वभूमिवर मुंबईतील शाळा, महाविद्यालये, एसटी आणि काही खासगी सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. 

बंद संदर्भातील प्रत्येक अपडेट्स

1.55 - वसई, विरार, नालासोपाऱ्यात बंदला मोठा प्रतिसाद

1.50 - मुंबई आंदोलनाचा समारोप - विरेंद्र पवार

1.45 -

 

1.30 - 4 बेस्ट बसचे मार्ग बदलले

1.00 - परळ एसटी डेपो बंद 

12.45- 

 12.40 - मुंबईतील इंटरनेट सेवेवर परिणाम

12.35 - मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे आंदोलकांनी रोखला, वाहतूक ठप्प

12.30 - दादरमधील दुकानं उशिरा सुरू

12.25 - एक बाजूला आंदोलन तर दुसऱ्या बाजूला साफसफाई 

12.20 - वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील आंदोलनकर्त्यांनी टाळ्या वाजवून केली घोषणाबाजी

 

12.15 - वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील दृश्य

12.10 - दादर स्थानकाबाहेरील अनेक दुकान बंद

12.00 - वांद्र्यातील ठिय्या आंदोलनात महिलांचाही सहभाग

11.30 - कर्जतमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोखून धरला 

11.20 - मराठा समाज आंदोलनस्थळी, आंदोलनकर्त्यांची सरकारविरोधी घोषणाबाजी

11.15 -  कल्याण परिसरात दुकानं आणि बाजारपेठा उशिरा उघडल्या

11.09 - वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलनाला सुरुवात

10.28 -

 

10.00 - वांद्रे कलानगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त

9.45 - पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर बंदचा परिणाम

9.15 - राज्यातील बहुतांशी वाहतूक सकाळपासून बंद

9.10 -कुर्ला, परळ आणि मुंबई सेंट्रल डेपो बाहेर पोलिस बंदोबस्त

9.05 - एसटी महामंडळाचा अघोषित बंद, मराठा आंदोलनामुळे एकही बस सुटली नाही.

9.00 - नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट राहणार बंद

8.30 - दादर मार्केटमध्ये भाज्यांच्या गाड्यांची आवाक झाली नाही

8.05 - मुंबईत रेल्वे, बस सेवा सुरळीत सुरू

8.00 - मुंबईतील अनेक शाळांना सुट्टी

वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासोर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक सकाळी ११ वाजता जमून शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन करतील. शिवाय हे आंदोलन दुपारी २ वाजेपर्यंत राहील, असं मराठा क्रांती महामोर्चाचे मुंबईतील सन्वयक वीरेंद्र पवार यांनी बुधवारी सांगितलं होतं.


हेही वाचा - 

महाराष्ट्र बंद, मुख्य सचिवांकडून सुव्यवस्थेचा आढावा

आता मूक नाही तर 'मुख बंद' आंदोलन

पुढील बातमी
इतर बातम्या