मराठा क्रांती मूक मोर्चा बाइक रॅलीला सुुरुवात

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

मालाड - पश्चिम उपनगरातील बोरिवली, चारकोप, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी परिसरातून रविवारी सकाळी मराठा क्रांती मुक मोर्चा बाइक रॅलीला सुरुवात झाली. सर्व मराठा समाजाचे सदस्य पश्चिम द्रुतगती महामार्गावर एकत्रित आले. यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांनी हातात भगवा झेंडा, काळ्या रंगाच्या टी शर्ट, डोक्यावर पांढरी टोपी आणि हेल्मेट परिधान केलं होतं. मराठा समाजाचे सर्व सदस्य शांतीने मूक मोर्चा रॅलीत एक-एक करून सहभागी झाले. पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या एका बाजूनं शिस्त पद्धतीनं ही बाइक रॅली निघाली. या रॅलीत हजारोंच्या स्ंख्येनं मराठा समाजाचे सदस्य बाइकसह सहभागी झाले.

पुढील बातमी
इतर बातम्या