एमआयएम लढवणार ७४ जागा- जलील

वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडल्यावर एमआयएम (MIM) आता स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. एमआयएमने ७४ जागा लढवणार असून त्यासाठी उमेदवारांच्या मुलाखती सुरू करण्यात आल्याची माहिती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सध्या एमआयएम ७४ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. त्यानुसार मालेगाव, बडगाव, भोकर, नांदेड मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून टप्प्याटप्याने इतर मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. एमआयएम सोबत दलित मराठा आणि ओबीसी समाज असल्याचा दावा त्यांनी केला.   

वंचित बहुजन आघाडीसोबत युती न झाल्याबद्दल मला कारणीभूत ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु यांत काहीही तथ्य नसल्याचं जलील यांनी सांगितलं. 


हेही वाचा-

‘आरएसएस’च्या लोकांमुळे आमची युती तुटली- जलील

काँग्रेससाेबत युती नाहीच, स्वबळावर लढवणार निवडणूक - प्रकाश आंबेडकर


पुढील बातमी
इतर बातम्या