पालिका निवडणुकीसाठी मनसेची बैठक

मुंबई - मुंबादेवी विधानसभा प्रभाग क्र. २१३ कामाठीपुरा विभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष केशव मुळे यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूकीची जोरदार तयारी सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अागामी पालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन केशव मुळे यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी मतदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाची आखणी देखील करण्यात आली आहे. तसंच घराघरात जाऊन मतदारांच्या समस्याची चर्चा करण्याची गरज आहे, असं देखील त्यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या