'मनसे' बाल दिन साजरा

करिरोड - पालिकेच्या ना. म. जोशी शाळेत मनसेनं लहान मुलांसोबत बालदिन साजरा केला. जागतिक बाल दिनाच्या निमित्तानं मनसे शाखा क्रमांक १९४ चे अध्यक्ष मारुती दळवी आणि कार्यकत्यांनी मुलांना खाऊ, खेळणी आणि अभ्यासासाठी लागणाऱ्या साहित्याचं वाटप केलं. यातून लहान मुलांच्या पालकांच्या मनात घर करण्याचा आणि पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसंपर्क साधण्याचा प्रयत्न मनसे करत आहे. त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणि पालकांच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह दिसून येत होतं.

पुढील बातमी
इतर बातम्या