अनधिकृत बांधकामाच्या कारवाईविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन

आझाद मैदान - दिघा आणि मालाड येथील अनधिकृत बांधकामाच्या कारवाईविरोधात राष्ट्रवादीने आझाद मैदानात 10 मार्चला आंदोलन केलं. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. या वेळी जिथल्या इमारतींवर कारवाई झाली आहे, त्याच ठिकाणी पीडित कुटुंबियांना जागा देण्यात यावी, तसेच बोरीवलीतल्या संजय गांधी नॅशनल पार्क इथल्या मालाडजवळील जमिनीवर झोपडीपट्टीधारकांचे पुनर्वसन व्हावे अशा विविध मागण्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केल्या.

कमळ सरकारने नेहमीच गरिबांच्या पोटावर पाय दिला असल्याचं वक्तव्य प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. तर राष्ट्रवादी नेहमीच गरिबांच्या मागे उभा राहीला असल्याचंही त्यांनी सांगितले. दिघावासियांबरोबरच मालाड येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या जमिनीवरील झोपडपट्ट्या अधिकृत असूनही तोडल्या, याच्या निषेधार्थ विद्या चव्हाण यांनी संघर्ष केला, तो संघर्ष उच्च न्यायालयापर्यंतही पोहचला, पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्यांनी 7 हजार रुपये महापालिकेत भरले त्या 32 हजारांपैकी 12 हजार झोपडपट्टीवासियांचं चांदिवली येथे पुनर्वसन करण्यात अाले, पण राहिलेल्या झोपडपट्टी धारकांचे देखील पुनर्वसन करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली.

इतर बातम्या