सहकार हा राज्याच्या अखत्यारीतला विषय- नवाब मलिक

सहकार हा विषय राज्य सरकारच्या अधीन असणारा हा विषय आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी उगाच धमकी देणं थांबवावं, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी केलं.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांवर आरोप केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार खात्याची निर्मिती करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सहकार विभागाची सूत्र सोपवली आहेत. तेव्हापासून महाराष्ट्रातील भाजपचे काही नेते एका वेगळ्या पद्धतीने या विषयावर भाष्य करत आहेत.

हेही वाचा- तर निवडणुकीत सत्ताधारी पक्षांवर बहिष्कार टाकू; राज्यातले व्यापारी संतापले

काही जण तर राज्यातील सहकार खात्यातील नेते आणि संस्थांची खैर नाही, अशी धमकी देखील देऊ लागले आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की सहकार हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. मल्टिस्टेट सोसायट्यांचा विषयच केंद्राकडे जातो. बँकींग क्षेत्रात केवळ रिझर्व्ह बँक त्याचं निरीक्षण करते. आरबीआयने मॅनेजिंग बोर्डच्या निर्मिती संदर्भात काढलेल्या आदेशांना गेल्या आठवड्यात कर्नाटक उच्च न्यायालायने स्थिगिती दिली आहे, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.

हे खातं नव्याने निर्माण करण्यात आलेलं आहे. जोपर्यंत नवीन नियम, नवीन कामकाज होत नाही, तोपर्यंत या खात्याचा नेमका वापर कसा होईल हे कळणार नाही. पण त्याआधीच भाजपचे (bjp) लोक धमक्या देत आहेत, त्यांना कळलं पाहिजे की अशाप्रकारे एखाद्या नेत्याच्या नावाने धमकी देणं योग्य नाही, असं नवाब मलिक यांनी भाजपला सुनावलं.

हेही वाचा- मुंबईतील 'या' भागांत मंगळवारी पाणीपुरवठा बंद अथवा कमी दाबानं होणार
पुढील बातमी
इतर बातम्या