'देवी-देवतांच्या नावांचा गैरवापर रोखण्यासाठी कायदा करणार'

मुंबई - मुंबई सहित राज्यात अनेक ठिकाणी देवी देवता, महापुरुष आणि गड किल्ल्यांच्या नावांचा गैरवापर रोखण्यासाठी कायदा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेमध्ये दिली. येत्या पावसाळी अधिवेशनात यासंदर्भात कायदा आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 

विधानपरिषद सदस्य अमरसिंह पंडित यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. राज्यभरात अनेक ठिकाणी महापुरुष आणि गड किल्ल्यांच्या नावाचा वापर बियरबार, परमिट रुम, मांसाहारी खानावळ, लोकनाट्य कला केंद्र तसेच देशी दारू विक्री केंद्रांना नावे देण्यासाठी करण्यात येत असून, देवीदेवतांच्या नावांचाही गैरवापर होत असल्याची लक्षवेधी अमरसिंह पंडित यांनी विधानपरिषदेत मांडली होती. यावर उत्तर देताना उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, देवी देवता आणि थोर महापुरुषांच्या नावाचा वापर करणे हे चुकीचे आहे. याविरोधात सध्या कुठलाही कायदा अस्तित्वात नाही. यासाठी कामगार विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग मिळून हा गैरवापर रोखण्यासाठी कायदा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या