नितीन गडकरींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. मुलीच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी गडकरी मातोश्रीवर आले होते. विशेष म्हणजे मंगळवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं नोटा बंदी आणि जिल्हा सहकारी बँकांवर नवीन नोटा देण्याच्या बंदीवर मोदींची भेट घेतली. त्यामुळे या दोन्ही भेटीची वेळ पाहता ही भेट राजकीय तर नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली.

पुढील बातमी
इतर बातम्या