सेल्फी पॉईंट - थ्री

दादर - सेल्फी पॉईंटच्या वादावर महापालिकेने अखेर तोडगा काढला आहे. आता शिवसेना, भाजपा आणि मनसे या तिघांचे सेल्फी पॉईंट तुम्हाला शिवाजी पार्कमध्ये पाहायला मिळाले तर त्यात नवल वाटायला नको. तिन्ही राजकीय पक्षांचे सेल्फी पॉईंट आता जवळ-जवळ असतील, अशी चर्चा आहे.

यासंदर्भातच मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी पालिकेच्या जी उत्तर विभागाचे वॉर्ड ऑफिसर रमाकांत बिरादार यांची शुक्रवारी भेट घेतली. या वेळी संदीप देशपांडे यांनी जुन्या सेल्फी पॉईंटच्या जागेसाठी हट्ट धरला. तसेच भाजपाला एका दिवसात परवानगी दिलीच कशी? असे म्हणत त्यांनी वॉर्ड ऑफिसरलाच फैलावर घेतले. तसेच येत्या 8 मार्चला म्हणजेच महिला दिनी मनसे त्याच जागेवर नवीन थीम साकारणार आहे, हेही संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले. नगरसेवक संदीप देशपांडे यांनी सेल्फी पॉईंट बंद करण्याचा निर्णय घाईत घेतला. त्यामुळे सेल्फी पॉईंट कुणाचा हे श्रेयवादाचे राजकारण भलतेच रंगात आले आहे. येत्या काळात विकासकामांचे काही माहित नाही पण दादरकरांना मनोरंजनासाठी अनेक सेल्फी पॉईंट उपलब्ध होतील एवढे मात्र नक्की.

मनसेचा सेल्फी पॉईंट होता अनधिकृत
मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी ‘सेल्फी पॉइंट’ बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, भाजपाने लगेच संधी साधत वॉर्ड ऑफीसमध्ये विनंतीपत्र पाठवून परवानगीही मिळवली. मात्र यामुळे संतप्त झालेल्या संदीप देशपांडे यांनी शु्क्रवारी वॉर्ड ऑफिसर रमाकांत बिरादार यांच्या कार्यालयात जावून त्यांना याचा जाब विचारला. यावेळी वादावादीत मनसेचा शिवाजी पार्कमधील हा ‘सेल्फी पॉइंट’ अनधिकृत असल्याचे संदीप देशपांडे ओघात बोलून गेले. त्यांच्यात झालेला वाद खालील व्हिडिओत पाहू शकता. 


पुढील बातमी
इतर बातम्या