शिवसेनेकडून वह्या वाटप

गोरेगाव - रामनगर, कामा इस्टेट, सोनावाला वाडी, वनराई, आरे या परिसरातल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप करण्यात आले. शिवसेना आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाच हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार मोठ्या वह्या देण्यात आल्या. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या