सोनिया गांधींचा 70 वा वाढदिवस

दहिसर - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी 70 वर्षांच्या झाल्या. त्यानिमित्ताने दहिसर पश्चिम येथील गणपत पाटीलनगर मध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी केक कापून सोनिया गांधीचा वाढदिवस साजरा केला. या वेळी शशिकला पांडे, निलम अलवी, जयश्री घाडी, रिंकी तिवारी, नंदिनी जयस्वाल, रुकसाना शेख, ममता शुक्ला अशा अनेक महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या. या वेळी मुलांना कंपास बॉक्स वाटण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या