video: ठाकरे सरकारचे पोलीस कुठे गेले? गोवंडीतील शिवाजी नगरमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा उडतोय फज्जा

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने केवळ केंद्र सरकारच नाही, तर राज्य सरकारला देखील आपल्या पातळीवर निर्णय घेऊन सातत्याने लाॅकडाऊन (lockdown) वाढवावा लागत आहे. एका बाजूला सरकार लाॅकडाऊन वाढवत असलं, तरी सर्वसामान्यांकडून आता लाॅकडाऊनचं किंवा सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं (social distancing) पालन होताना देखील दिसून येत नाहीय. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (bjp leader kirit somaiya) यांनी देखील ठिकठिकाणी होणाऱ्या गर्दीवर बोट ठेवत ठाकरे सरकारला (thackeray government) प्रश्न केला आहे.

किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. हा व्हिडिओ गोवंडीतील शिवाजी नगर (shivaji nagar govandi), रोड क्रमांक २ इथं १५ मे रोजी रात्री ८ वाजताचा असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूंची सगळी दुकाने सुरू असून या दुकानांमधून खरेदी करण्यासाठी शेकडो महिला-पुरूषांची गर्दी झालेली दिसून येत आहे.  

त्याला उद्देशून "हम नही सुधरेंगे" शिवाजी नगर गोवंडी रोड क्रमांक २ येथील आज १५ मे, रात्री ८ वाजे ची ही गर्दी, ठाकरे सरकारची पोलिस आहे कुठे? असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लाॅकडाऊन वाढवलं, ठाकरे सरकारचा निर्णय

देशातील कोरोनाबाधितांची संख्या ९० हजारांच्या पुढं केली असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३० हजार ७०६ झाली आहे. आतापर्यंत राज्यभरात ७०८८ रुग्ण बरे झाले आहेत. तर २२ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. कोरोनाबाधित रुग्ण वाढत असताना देखील सोशल डिस्टन्सिंगच्या बाबतीत नागरीक अजूनही गंभीर असल्याचं चित्र या व्हिडिओतून दिसत आहे.

लाॅकडाऊन आणि कोरोनाबाधितांवर होणाऱ्या उपचारांच्या मुद्द्यावरून किरीट सोमय्या सातत्याने ठाकरे सरकारला लक्ष्य करत आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार करणं तर दूरच परंतु त्यांना रुग्णालयांतच दाखल करून घेण्यात येत नाही, असा आरोप सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. एवढंच नाही तर त्यांनी यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र देखील लिहिलं होतं. 

माझ्याकडे मदतीसाठी आलेल्या ४ रुग्णांना मी आणि डाॅक्टरांनी ६ खासगी रुग्णालयांत दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु एकाही रुग्णालयांत त्यांना दाखल करून घेतलं नाही. यातील दोघेजण मुलूंड आणि दोघेजण सायनचे होते. रुग्णालयातील सगळे बेड भरलेले असल्याने कोरोनाबाधितांना दाखल करून घेता येणार नाही, असं उत्तर त्यांनी दिल्याचं सोमय्यांनी सांगितलं.  

हेही वाचा - Coronavirus Pandemic: राज्यात दिवसभरात 67 जणांचा मृत्यू, दिवसभरात 1606 नवीन रुग्ण
पुढील बातमी
इतर बातम्या