भायखळ्यात भाजपामध्ये फूट

भायखळा - प्रभाग क्रमांक 207 मध्ये भाजपामध्ये फूट पडली आहे. प्रभाग क्रमांक 207 मधून भाजपा महिला मोर्चा महामंत्री मालती पाटील या इच्छुक होत्या मात्र त्यांच्याऐवजी सुरेखा लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या मालती पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, शुक्रवारी त्यांनी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे निवडणुकीच्या काळात पाटील विरूद्ध लोखंडे असा सामना रंगणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या