महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान मोदींचा फोन, म्हणाले...

कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना फोन करून माहिती घेतली तसंच दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे, अशा शब्दांत कौतुकही केलं. 

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावं, अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसं नियोजन करीत आहोत त्याविषयीही मुख्यमंत्री बोलले.

प्रधानमंत्री आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, महाराष्ट्राच्या काही सूचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

हेही वाचा- मराठा समाजाला भडकवणारी वक्तव्य करू नका- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मागे काही दिवसांपूर्वी केंद्र विरूद्ध राज्य असा संघर्ष सातत्याने बघायला मिळत होता. केंद्राकडून होणारा अपुरा लस पुरवठा, रेमडेसिवीर, आॅक्सिजनचा तुटवडा यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेते केंद्राकडे बोट दाखवत होते. तर केंद्रातले आणि महाराष्ट्रातील (maharashtra) भाजपचे नेते राज्य सरकारला दोषी ठरवत होते. यामुळे केंद्र-राज्यातील तणाव कमालिचा वाढला होता.

त्यातच सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील (mumbai) कोरोना संकटाच्या व्यवस्थापनाबद्दल प्रशासन आणि सरकारचं कौतुक केल्यापासून परिस्थितीत विरोधकांचा सूर थोडाफार नरमलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दूरध्वनीमुळे दोन्ही बाजूंकडील तणाव निवळण्यास मदतच होणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी राज्यात ५४०२२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. शुक्रवारी नवीन ३७३८६कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ४२६५३२६ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ६५४७८८अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ८५.३६ टक्के झालं आहे.

(pm narendra modi talks with maharashtra cm uddhav thackeray on a phone call)

हेही वाचा- बॉलिवूडमधील रोजंदार कामगारांच्या मदतीस धावला सलमान खान
पुढील बातमी
इतर बातम्या