राजकीय पक्षांच्या मंडपांचे 'विसर्जन'

अंधेरी - गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान चमकोगिरी करण्यासाठी न्यू लिंक रोडवर राजकीय पक्षांकडून मंडप उभारण्यात आले होते. मात्र गुरुवारी सकाळी पोलिसांनी कारवाई करत हे मंडप हटवले. 

गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी या परिसरातील सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती अंधेरी लोखंडवाला सर्कल, आदर्शनगर, बेहरामबाग लिंक रोडमार्गे विसर्जनासाठी जातात. या विसर्जन मिरवणुकीत अडथळा येऊ नये म्हणून या रस्त्यावर अडथळा असलेले स्टॉल, गॅरेज ओशिवरा पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत हटवले. पण नेहमीच प्रसिद्धीसाठी उत्सुक असणा-या राजकीय पक्षांनी या मार्गावर बुधवारी रात्री मंडप थाटले. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. अखेर आज सकाळी पोलिसांनी कारवाई करून हे मंडप हटवले आणि मार्ग मोकळा केला. 

पुढील बातमी
इतर बातम्या