शिवसेनेला भांडुपमध्ये पहिला झटका

भांडुप - महानगरपालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेला पहिला झटका दिला आहे. भांडुप पश्चिमेकडील वॉर्ड क्रमांक १११ चे माजी शाखाप्रमुख आणि भांडुप विभाग संघटक असलेल्या राजन कांदेकर यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आहे. कांदेकर यांनी भाजप नेते किरीट सोमय्या, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, पालिका गटनेता मनोज कोटक, स्थानिक नेते प्रविण दहीतुले यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. पालिकेडून विभाग, लोकसंख्या रचनेनुसार नवीन वॉर्ड रचना घोषित झाली असताना या रचनेनुसार पक्ष संघटना बांधणी सुरू असतानाच सेनेला भाजपने दिलेला हा झटका जिव्हारी लागला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नाराजांना गळाशी लावण्यासाठीचे राजकारण रंगणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या