मतदानाबाबत विद्यार्थ्यांची जनजागृती

वडाळा - मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी पालिका आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतलाय. 23 कॉलेजमधल्या एनएसएसच्या 1500 विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली. वडाळा पूर्व ते गुरुनानक कॉलेजपर्यंत संयुक्त रॅली काढण्यात आली. यामध्ये पोद्दार महाविद्यालय, के.सी. महाविद्यालय, एम. डी.महाविद्यालय,महाराष्ट्र महाविद्यालय, लाला लजपतराय महाविद्यालय, शासकीय विधी महाविद्यालय, एलफिस्टन महाविद्यालय, सिडनहॅम महाविद्यालय, के.सी. महाविद्यालय,सिध्दार्थ महाविद्यालय (आनंद भवन), निर्मला निकेतन महाविद्यालय, जय हिंद महाविद्यालय, हिंदूजा महाविद्यालय, के.सी.विधी महाविद्यालय, रुपारेल महाविद्यालय,विल्सन महाविद्याल , सिध्दार्थ महाविद्यालय (बुध्दभवन),एसएनडीटी विद्यापीठ,अकबर पिरभाई महाविद्यालय, एन.एस. महाविद्यालय,सीआईएस महाविद्यालय यांचा समावेश होता. या रॅलीच्या आयोजनासाठी विभाग निरिक्षक (निवडणूक) श्री. सत्यवान मिस्त्री यांनी सर्व महाविद्यालयांसोबत समन्वयनाची भूमिका पार पडली. मतदान नोंदणीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर भेट द्या, अथवा 1800-22-1950 या टोल फ्री हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन विद्यार्थ्यांनी रॅलीत केले.

कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमतील प्रसिद्ध मराठी अभिनेते अरुण कदम, सुरेश शेवाळे रॅलीत सहभागी झाले होते. त्याचबरोबर एनएसएस कार्यक्रम समन्वयक बाबासाहेब बिडवे, विजय गावडे, जिल्हा समन्वयक डॉ. सतीश कोलते, विद्यालंकार कॉलेजच्या प्राचार्य डॉ. रोहिणी केळकर, उपप्राचार्य असिफ रामपुरावाला, गुरुनानक कॉलेजच्या प्राचार्य विजय दाभोळकर, महानगरपालिका अधिकारी सत्यवान मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पुढील बातमी
इतर बातम्या