काँग्रेसचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

खेरवाडी - राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ काँगेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी वांद्रे पूर्व खेरवाडी हाय-वेवर रस्तारोको आंदोलन केलं. नगरसेविका गुलस्तान शेख आणि खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं. या वेळी कार्यकर्त्यांनी 'राहुल गांधी आगे बढो हम तुमारे साथ हेै' अशी घोषणाबाजीही केली. परंतू स्थानिक पोलिसांनी आंदोलनावर प्रतिबंध घालत खेरवाडी महामार्ग नागरिकांसाठी चालू करून दिला.

पुढील बातमी
इतर बातम्या