काँग्रेसची शहिदांना श्रद्धांजली

कुलाबा - उरीमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना मुंबई काँग्रेस कुलाबा विभागाच्या वतीने सोमवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. गेट वे ऑफ इंडिया येथे जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेणबत्त्या लावून शहिदांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी नगरसेविका सुषमा शेखर, विनोद शेखर व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या