संजय घाडी 'मनसे' शिवसेनेत

वांद्रे - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  मनसेचे महासचिव संजय घाडी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मनसेला मोठा धक्का बसलाय. संजय घाडी हे राज ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक मानले जात. ते राज यांचे बालपणापासूनचे मित्रही. राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंनी विद्यार्थी सेनेचं अध्यक्ष केलं, तेव्हापासून घाडी यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. राज ठाकरेंसोबतच ते शिवेसेनेतून बाहेर पडले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत त्यांनी सरचिटणीसपद सांभाळलं. मात्र, रविवारी मातोश्रीवर जाऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला.

पुढील बातमी
इतर बातम्या