राजकारणात 'जाऊ बाई जोरात'

मानखुर्द -  रंगमंचावर 'जाऊ बाई जोरात' हे नाटक चांगलेच गाजले. त्या नाटकात जश्या जावा आहेत तश्याच दोन जावा आता राजकीय पटलावर आपलं भविष्य आजमावत आहेत. मुंबई महानगर पालिका निवडणुकीत दोन जावा मानखुर्दमधून शिवसेनेच्या वतीने निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे आणि राहुल शेवाळे यांची वहिनी वैशाली शेवाळे या वार्ड क्रमांक 142 आणि 144 मधून निवडणूक लढवत आहेत. नेहमीच काँग्रेस पक्षावर घराणेशाहीचा आरोप शिवसेना करते. पण ही घराणेशाही नाही तर शिवसैनिकांची आणि जनतेची मागणी आहे असे म्हणून वेगळ्या पद्धतीन घराणेशाही करताना शिवसेना दिसते आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या