बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवदिंडी

शिवाजी पार्क - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गेली ४ वर्षे दिंडी चे आयोजन केले जाते. या दिंडीमध्ये किमान ५० लोकांचा समावेश असतो. या वर्षी दादरच्या सेनाभवन परिसरातून ईशान्य मुंबई वारकरी मंडळी घाटकोपर आणि शिवधनुष्य प्रतिष्ठान यांच्या वतीने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. सालाबादप्रमाणे यंदाही वारकरी महिला पुरुष आणि तरुणांनी या दिंडीमध्ये सहभाग घेतला होता. या दिंडीचे नेतृत्व कीर्तनकार रामदास महाराज शेळके यांनी केले.

पुढील बातमी
इतर बातम्या