निरूपम यांच्या पुतळ्याचे दहन

टागोरनगर - विक्रोळी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून संजय निरुपम यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केल्याप्रकरणी बुधवारी निषेध करण्यात आला. सेनेचे माजी महापाैर आणि विधान सभा मतदार संघाचे प्रमुख दत्ता दळवी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी निरूपम यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली. '56 इंचाच्या छाती'कडून पुरावे सादर होत नाहीत, तोपर्यंत शंका राहणारच, असे बेताल वक्तव्य देखील निरूपम यांनी केले होते. त्यानंतर सर्वत्र या विरोधात पडसाद उमटत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या