गुजरात निवडणूक: १ किलो सोनं घालून केला प्रचार, शिवसेनेच्या उमेदवाराचं डिपाॅझिट झालं जप्त

गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येताच पुन्हा एकदा या राज्यात भाजपाची एकहाती सत्ता प्रस्थापित होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. अशा स्थितीत गुजरातमध्ये भाजपाला टक्कर देण्यासाठी शिवसेनेने काही उमेदवार या आखाड्यात उतरवले होते. त्यापैकी अंगावर १ किलो सोनं घालून प्रचार करणारे शिवसेनेचे अहमदाबादमधील उमेदवार कुंजल पटेल सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र बनले होते. मात्र निकालात पटेल यांचं चक्क डिपाॅझिट जप्त झालं आहे.

नाव कमावलं

अहमदाबादच्या दर्यापूर- ५१ विधानसभा क्षेत्रातून कुंजल पटेल शिवसेनेतर्फे उभे राहिले होते. कुंजल १ किलो सोनं अंगावर चढवून मतदारांकडून मत मागत असल्याने त्यांना 'गोल्डन कॅन्टीडेट' अशा टोपण नावाने ओळखलं जाऊ लागलं. मात्र मतमोजणीत त्यांना डिपाॅझिटही वाचवता आलं नाही. परंतु पराभूत झाल्यानंतरही या शिवसेनेच्या उमेदवाराने या विधानसभा क्षेत्रात नाव कमावलं आहे.

सासऱ्याचं सोनं

पराभवानंतर प्रतिक्रिया देताना कुंजल म्हणाले, मला सोनं घालण्याचा शौक आहे. निवडणूक आयोगापुढे मी ४९ लाख रुपयांची संपत्ती घोषित केली होती. यामध्ये २४ हजार रुपये रोख, ४५ तोळे सोने आणि २ कारचा समावेश होता. मी जे सोनं घालून फिरत होतो, ते सोनं माझ्या सासऱ्याचं आहे.


हेही वाचा-

भाजपाच्या मुंबई टीमने सूरत जिंकलं!


पुढील बातमी
इतर बातम्या