जोगेश्वरी - जागतिक महिला दिनाचे औचित्य जोगेश्वरीत सोमवारी शाब्बास वहिनी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जोगेश्वरी विधानसभेचे शिवसेनेचे आमदार आणि राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली जोगेश्वरीतील शिवाई मैदान येथे मनिषा वायकर यांच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली. या वेळी विभागातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.