चेंबूरच्या कब्रस्तानचं नुतनीकरण

चेंबूर - गेल्या अनेक वर्षांपासून चेंबूरनाका परिसरात असलेल्या कब्रस्तानची दुरवस्था झाली होती. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रकाश फातर्पेकर यांनी याची दखल घेतली आहे. त्यानुसार कब्रस्तानच्या नुतनीकरण आणि सुशोभिकरणाचा शुभारंभ  कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक आणि उपनेते सुबोध आचार्य यांच्या हस्ते शनिवारी झाला. या वेळी विभागप्रमुख मंगेश सातमकर, महिला विभाग संघटक रिटा वाघ उपस्थित होते. 

 

पुढील बातमी
इतर बातम्या