बँकेतील नोकरीसाठी शिवसेनेचं मार्गदर्शन

मुलुंड - मुलुंडमधील शिवसेना शाखा क्रमांक 105 मध्ये रविवारी खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. बँक ऑफ बडोदामध्ये दहावी शिक्षित तरुणांसाठी शिपाई या पदासाठी भरती सुरू आहे. या भरती संदर्भात तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी तसंच या नोकरीसाठी ऑनलाइन प्रकिया कशी करावी याचंही मार्गदर्शन करण्यात आलं. अनेक तरुणांनी यामध्ये सहभाग घेतला होता. 'आपल्याकडे कुठेही नोकरीची संधी उपलब्ध झाली तरी ती तरुणांपर्यंत पोहचतच नाही. तेव्हा ही संधी तरुणांपर्यंत पोहचवण्याचं काम करतो' अशी माहिती शाखा प्रमुख दीपक सावंत यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या