एकनाथ शिंदे सूरतमधील 'या' हॉटेलमध्ये, भाजपच्या नेत्यांसोबत खलबतं

शिवसेना नेते एकनाथ शिंदे सध्या सूरतमध्ये असून त्यांची भाजप नेत्यांसोबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना आणि काँग्रेसचे आमदार असल्याचीही चर्चा आहे. 

एकनाथ शिंदे हे सोमवारी रात्रीच गुजरातमध्ये दाखल झाले असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे आणि 11 आमदार हे सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या हॉटेलबाहेरील बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि गुजरात भाजपचा एक मोठा नेता यांच्यात रात्री उशिरा बैठक झाली. ही बैठक गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्यासोबत ही भेट झाली असल्याची चर्चा जोर पकडू लागली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या