मराठीचा अपमान सहन करणार नाही, शिवसेना आमदाराने फाडली इंग्रजीतली कागदपत्रे

शासकीय कामकाज मराठीतून करण्याचा शासन निर्णय असूनही प्रशासकीय अधिकारी इंग्रजीतून कामकाज करतातच कसे? असा प्रश्न विचारत शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी कागदपत्रे फाडून महापालिका अधिकाऱ्यांवर भिरकावल्याचा प्रकार सोमवारी दुपारी घडला. 

हेही वाचा- आता शरद पवारांना करायचंय राष्ट्रपती! संजय राऊतांची नवी मोहीम

दिलीप लांडे दुपारी अंधेरी ते कुर्ला रस्ता रुंदीकरणाच्या कामासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी चेंबूर येथील महापालिका उपायुक्तांच्या एम/पश्चिम येथील कार्यालयात गेले होते. तिथं अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू असताना सहायक अभियंता अशोक तरडेकर आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्ता रुंदीकरणात बांधीत गाळेधारक आणि सदनिकाधारकांची नावे लांडे यांच्यासमोर सादर केली. ही नावांची यादी इंग्रजीतून असल्याने लांडे संतापले. आणि त्यांनी ही यादी फाडून अधिकाऱ्यांवर भिरकावली. 

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना लांडे म्हणाले की, मुख्यमंत्री यांनी स्वत: केंद्र सरकारकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी केली आहे. शासकीय कामकाज मराठीतून करण्याचा शासन निर्णय असूनही अधिकारी इंग्रजीतून कामकाज करतात. मराठीचा अपमान यापुढं सहन करण्यात येणार नाही.  

हेही वाचा- जेएनयूतील हल्ला बघून २६/११ ची आठवण झाली- उद्धव ठाकरे

पुढील बातमी
इतर बातम्या