कुंभारवाड्यात आरोग्य शिबिराचं आयोजन

कुंभारवाडा - खारावा गल्ली इथं रविवारी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात इसीजी, ब्लड चेकअप, शुगर चेकअप मोफत करण्यात आलंय. प्रभाग क्रमांक 216 शिवसेना शाखेतर्फे या शिबिराचं आयोजन केलं होतं. आरोग्य शिबिरात अनेक गिरगावकर सहभागी झाले होते, अशी माहिती शाखाप्रमुख राजेश अवलेगावरकर यांनी दिली. विभागप्रमुख पाडुरंग सकपाळ, शाखाप्रमुख, युवासेना आणि विभागातील शिवसैनिक उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या