शिवसेनेकडून महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी

  • सुनील महाडेश्वर & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

दहिसर - दहिसर येथील महिलांनी स्वयंपूर्ण व्हावे या उद्देशाने मुंबई महानगरपालिका प्रशासन प्रयत्न करत आहे . याचाच एक भाग म्हणून शिवसेना नगरसेवक श्री उदेश पाटेकर यांच्या प्रयत्नाने पालिकेच्या वतीने गरजू महिलांना घरघंटी, शिलाई मशिन, फाॅलबिडींग मिशनचे वाटप तसेच शिवणकाम, कुकिंग, राजगिरा चिक्की प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. पुढच्या टप्प्यात आणखी काही महिलांना अश्या यंत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी स्थानिक शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, प्रभारी विभाग प्रमुख विलास पोतनीस, सुनिल डहाळे, आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या