प्रभादेवी - सरसंघचालक मोहन भागवतांचं नाव राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी चर्चेत आहे. मोहन भागवत यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देऊन भाजपाने हिंदुत्वाचे चक्र पूर्ण करुन भारताला हिंदू राष्ट्र करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'मुंबई लाइव्हला' दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. तसेच भारताला हिंदुराष्ट्र करण्यासाठी पुढाकार घ्यावा असंही त्यांनी यावेळी सांगत मोहन भागवत यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देत असतील तर त्याचे स्वागत असल्याचे म्हटले आहे. हा हिंदूराष्ट्र या संकल्पनेसाठी उत्तम पर्याय असू शकतो मात्र याला समर्थन द्यायचं कि नाही याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील असेही त्यांनी सांगितले.