कॅन्सर हा आजार बरा होऊच शकत नाही असा गैरसमज आजही देशात आहे. पण देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक कॅन्सरचे रुग्ण उपचारांसाठी टाटा मेमोरिअल रुग्णालयात येतात. त्यांच्यावर उत्तम उपचार करून त्यांना जीवनदान देण्याचे काम रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग करत असतो. त्याचप्रमाणे या रोगाचे निदान व्हावे यासाठी सरकार देखील प्रयत्नशील आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव परळ (पू.) येथील टाटा रुग्णालयाच्या सभागृहात शुक्रवारी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
टाटा मेमोरिअल सेंटर एससी, एसटी आणि ओबीसी एम्प्लॉईज असोशिएशन यांच्या वतीने गेल्या 20 वर्षांपासून सदर कार्यक्रमाचे आयोजन टाटा रुग्णालयात करण्यात येते. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या माध्यमातून रुग्णांचे मनोरंजन आणि समाज प्रबोधनही करण्यात येते. या कार्यक्रमादरम्यान 100 रुग्णांना फळवाटप देखील करण्यात आले.