आठ दिवसांत उसळलेल्या लाटा थांबतील - संजय राऊत

प्रभादेवी - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला 300 हून अधिक जागा मिळाल्या. या यशानंतर प्रभादेवीच्या सामना वृत्तपत्राच्या कार्यालयात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी पत्रकार परीषद घेतली. 

"लोकशाहीच्या प्रकियेतून आलेले हे निकाल आहेत. भाजपाला मिळालेल्या या यशाचे आम्ही स्वागत करतो. भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आम्ही अभिनंदन करतो," अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "लोकांना जिकडे पर्याय दिसला तिकडे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्यांनी मतदान केले आहे. उत्तर प्रदेशमधल्या राजकारणाविषयी अधिक बोलायचे झाले तर मी म्हणेन विजय हा विजय असतो," असे राऊत म्हणाले. 

"भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे अभिनंदन करतो. रामाचा वनवास संपला आहे. लवकरच आपण राममंदिर निर्माणची अपेक्षा ठेऊया," असंही राऊत म्हणाले.

"उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारण विषयावर आपण आठ दिवसांनंतर बोलू. आठ दिवसांनंतर काही उसळलेल्या लाटा थांबतील. सर्वांना शिवसेनेचे महत्व आज लक्षात येईल. आता लोकांच्या लक्षात आले असेल. आम्ही मुंबईत मोदी लाट कशी थांबवली?," हेही सांगायला ते विसरले नाहीत.

पुढील बातमी
इतर बातम्या