दिंडोशीत शिवसैनिकांमध्ये सोशल वॉर

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

दिंडोशी - प्रभाग क्रमांक 37 मधून महिला उपविभाग संघटक पूजा चव्हाण आणि 43 मधून काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक भोमसिंग राठोड यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक शिवसेना कार्यकर्ते नाराज झाले आहेत आणि त्याचेच पडसाद आता सोशल मीडियावर उमटू लागले आहेत. विद्यमान नगरसेवक प्रशांत कदम आणि प्रभाग 37 च्या उमेदवार पूजा चव्हाण यांच्या समर्थकांमध्ये कोण कट्टर शिवसैनिक यावरून आता सोशल वॉर सुरु झालं आहे. प्रभाग 37 मध्ये प्रशांत कदम या पत्नी योगिता कदम आणि प्रभाग 43 मधून भाचा रुपेश कदम याला तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र या दोन्ही ठिकाणी उमेदवार नेमण्यात आले. त्यामुळे काहीशा नाराज असलेले कदम समर्थकांनी फेसबुकवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या