समाज मंदिराचे भूमिपूजन

  • कल्याणी उमरोटकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

जोगेश्वरी - जोगेश्वरीतील लोटस् पार्कच्या बाजुला, गुरू गोविंद इंडस्ट्रिच्या समोर जयकोच रोड येथे समाज मंदिर बांधण्याचा भुमिपुजनाचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. शनिवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना नगरसेवक, आमदार सुनिल प्रभु यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शिवसेना नेते आमदार उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना नेते आमदार गजानन किर्तीकर देखील उपस्थित राहणार आहेत.तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी रविवारी मोफत वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.ह्या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी आपली मागील वर्षाची गुणपत्रिका आणि रेशनकार्डची प्रत ६आणि ७ऑक्टोबर रोजी जमा करावी.

पुढील बातमी
इतर बातम्या