अधिवेशनापूर्वी विरोधक आक्रमक

नागपूर - सोनम गुप्तापेक्षा राज्य सरकार जास्त बेवफा असा आरोप करणारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. राज्यातील सरकार म्हणजे नोबिता डोरेमॉनचं कार्टून असल्याची टीका पाटील यांनी केलीय. नोटाबंदीमुळे लोकांचा जीव जात असून, या सरकारवर भारतीय दंडविधानातील कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल का करु नये असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. नागपूरमध्ये विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद घेण्यापूर्वी विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक पार पडली. यंदाही विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील सरकारवर टीका केलीय. सामान्य नागरिक आणि शेतक-यांचे नोटाबंदीमुळे झालेले नुकसान सरकारने भरुन द्यावे अशी मागणी यावेळी धनंजय मुंडे यांनी केली.

पुढील बातमी
इतर बातम्या