काँग्रेसचा पथनाट्यातून प्रचार

सीएसटी - आगामी महानगरपालिका निवडणुकीत मुंबई काँग्रेसतर्फे पथनाट्याद्वारे संपूर्ण मुंबईभर प्रचार आणि प्रसार करण्यात येणार आहे. या पथनाट्यात शिवसेना आणि भाजपा युतीवर भ्रष्टाचाराच्या आरोपांसोबतच मुंबईतील अनेक समस्या, अडचणी आणि ज्वलंत प्रश्न यांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच नोटाबंदीचा राष्ट्रीय प्रश्न ही लोकांसमोर यावेळी मांडला जाणार आहे. पथनाट्य शाहीर साबळे यांचे नातू आणि दिग्दर्शक केदार शिंदेंचे भाऊ मंदार शिंदे यांनी तयार केलेले आहे. मुंबईत 20 जानेवारी ते 19 फेब्रुवारीपर्यंत दररोज 5 ठिकाणी हे पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. मुंबईतील सर्व नेत्यांची इच्छा आणि मत आहे की मुंबईत स्वबळावर लढावे त्यानुसार आम्ही दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना कळविले आणि त्यांनी आम्हाला अनुमती दिलेली आहे. अशी माहिती संजय निरूपम यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या