...तर स्व:बळावरही लढू - अनिल परब

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, अन्यथा युती करून काहीही फायदा होणार नसल्याची टीका शिवसेना नेते अनिल परब यांनी केली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे युतीची चर्चा सुरू आहे. मात्र दुसरीकडे भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी गुरुवारी थेट ‘मातोश्री’वर टीका केली होती. ते म्हणाले किती वर्ष एकाच कुटुंबाकडे सत्ता दिली जाणार आहे? भाजपाच्या अटीवर शिवसेनेला युती करावी लागणार आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. हे वक्तव्य शिवसेनेच्या जिव्हारी लागले आहे. शिवसेनेच्या काही नेत्यांनी याबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला. शिवसेना नेते अनिल परब यांनी स्पष्ट केले की आज युतीची बैठक रद्द झाल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी. एक शिवसैनिक पक्षप्रमुखांचा अपमान सहन करणार नाही. गरज पडली तर स्व:बळावरही लढू शकतो. पण उद्धव ठाकरे यांच्यावरचे आरोप आणि त्यांचा अपमान सहन करणार नाही म्हणत त्यांनी सोमय्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिलंय. भाजपाच्या टीकेवर आता शिवसेनेने एक आक्रमक भूमिका घेतली असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मातोश्री आणि वर्षा बंगल्यावर लागले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या