राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारमधील अाणखीन एक मंत्री अडचणीत अाले अाहेत. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा सोलापुरातील अालिशान बंगला बेकायदेशीर असल्याचा अहवाल सोलापूरच्या महापालिका अायुक्तांनी दिली अाहे. याप्रकरणी अायुक्तांनी २६ पानांचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला अाहे. मात्र अापण जर दोषी अाढळलो तर मंत्रिपदापासून दूर जाऊन अाणि बंगला बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झाल्यास तो मी स्वखर्चाने जमीनदोस्त करीन, असं वक्तव्य सुभाष देशमुख यांनी केलं अाहे.
२००१ मध्ये सुभाष देशमुख यांच्या बंगल्याच्या बांधकामासाठी परवानगी नाकारली, मात्र त्यांनी लेखी अाश्वासन देत पुढील प्रत्येक गोष्टीसाठी मी जबाबदार असेन, असं प्रतिज्ञापत्र दिलं. त्या आधारावर सोलापूर महानगरपालिकेने २००४ साली देशमुख यांना वन बीएचके (600 स्क्वेअर फूट) बांधकाम करण्यासाठी सशर्त परवाना दिला होता. २०११ साली पुन्हा सुधारित बांधकामासाठी परवानगी मागण्यात अाली, तेव्हाही महापालिकेने परवानगी दिली होती. एकूण २२ हजार २४३ स्क्वेअर फूट बांधकाम करण्यात अाले अाहे.
महापालिकेच्या जागेत बंगला
महानगरपालिकेच्या आरक्षित जागेवर हा बंगला बांधल्याचे महापालिका आयुक्तांच्या अहवालात म्हटले आहे. ही जागा पालिकेच्या अग्निशमन विभाग अाणि व्यापारी गाळ्यांसाठी अारक्षित अाहे, असंही या अहवालात म्हटलं अाहे.
राजीनामा देण्याची तयारी
बेकायदेशीर बांधकामामुळे अडचणीत अालेल्या सुभाष देशमुख यांनी अाता राजीनामा देण्याची तयारी दाखवली अाहे. मात्र अापण परवान्यानुसारच बांधकाम केल्याचा दावा सुभाष देशमुख यांनी केला अाहे. या प्रकरणाची फेरचौकशी करण्यात यावी, अशी मागणी करतानाच मी दोषी अाढळलो तर मंत्रिपदापासून दूर जाईन, असंही सुभाष देशमुख यांनी म्हटलं अाहे.
हेही वाचा -