प्रचारासाठी सुप्रिया सुळे सज्ज

शिवडी - खासदार सुप्रिया सुळे मंगळवारपासून मुंबई महापालिकेच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघातील महिला कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून सकाळी 11 वाजता या मोहिमेला सुरुवात होणार आहे. पुढील तीन दिवस उत्तर पश्चिम, उत्तर मध्य आणि उत्तर मुंबई या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीतील उमेदवारांच्या निवडणूक कार्यालयांचे त्यांच्या हस्ते उद् घाटन केलं जाणार अाहे. त्यानंतर सायंकाळी उत्तर पश्चिम जिल्ह्यातील उमेदवारांच्या निवडणूक कार्यालयांचं उद् घाटन त्यांच्या हस्ते केले जाणार आहे. 18 आणि 19 जानेवारीला ही सायंकाळी सुप्रिया सु‌ळे यांच्या हस्ते उत्तर मध्य आणि उत्तर मुंबईतील काही उमेदवारांच्या निवडणूक कार्यालयांचं उद् घाटन होणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या