बाळासाहेबांचा 5 वा स्मृतिदिन, शिवाजी पार्कवर शिवसैनिकांची गर्दी

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शुक्रवारी 17 नोव्हेंबर रोजी 5 वा स्मृतिदिन. यानिमित्ताने महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातल्या शिवसैनिकांनी शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाच्या दर्शनासाठी लांबच-लांब रांगा लावल्या होत्या. याचसोबत परिसरात सर्वत्र बॅनर लावून, रांगोळी काढून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

भारतात अनेक नेते झाले आणि आहेत. पण प्रचंड लोकप्रियता मिळालेले लोक अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच असतात. त्यापैकीच एक म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे. राज्यभारातून येणाऱ्या शिवसैनिकांना रांगेत दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवसैनिक हा शहरातला असो किंवा ग्रामीण भागातला प्रत्येकजण एकच बोलतो 'सरून गेले दिवस टळून गेल्या राती, थांबता थांबेना मनातल्या जळत्या आठवणींच्या वाती, साहेब परत या...'

शिवतीर्थ म्हटले की डोळ्यासमोर उभी राहते ती दसरा मेळाव्याची गर्दी आणि शिवसैनिकांचा जल्लोष परंतु गेल्या 5 वर्षांपासून शिवतीर्थावर बाळासाहेब यांचे स्मृतिस्थळ आणि दरवर्षी याठिकाणी नतमस्तक होणारा शिवसैनिक हे एक वेगळे समीकरण पहायला मिळते.

पुढील बातमी
इतर बातम्या