शिवसेनेच्या युवासेना कॉलेज युनिटचं शुभारंभ

  • कल्याणी उमरोटकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

अंधेरी - मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेचजण युवा मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून अंधेरी (पूर्व) येथील तोलानी वाणिज्य महाविद्यालयात 22 डिसेंबरला शिवसेनेच्यावतीनं युवा कॉलेज युनिट सुरू करण्यात आलं. या युनिटच्या उद्घाटनाच्या वेळी जोगेश्वरी विधानसभेचे विभाग अध्यक्ष विशाल परब, युवासेना कॉलेज कक्ष अध्यक्ष वरुण सरदेसाई, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तीकर उपस्थित होते. युवकांसाठी शिवसेना सदैव तत्पर राहील आणि युवांना मार्गदर्शन करण्यासाठी हे युवा युनिट उभारल्याचं विशाल परब यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या