कोल्ड प्ले मध्ये राष्ट्रध्वजाचा अपमान - नवाब मलिक

नरिमन पॉइंट - जगप्रसिद्ध कोल्ड प्ले च्या मुंबईतील बीकेसी येथील कार्यक्रमात भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरद्वारे केलाय. वंदे मातरमच्या थीमवर गायक ख्रिस मार्टिनने गाणं सादर करताना तिरंगा कंबरेला खोवला होता. त्यानंतर तिरंगा भिरकावण्यात आला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतलाय. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर तिरंग्याचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शिवसेना प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलेय की, कोल्ड प्ले कार्यक्रमातील जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे ते पाहता तसे काही घडले असल्यास त्याची चौकशी करावी. मुख्यमंत्री स्वतः देशभक्त आहेत, त्यांनी जर तो प्रकार पहिला असेल तर ते योग्य ती कारवाई करतील असा आशावादही निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

 

पुढील बातमी
इतर बातम्या