जनतेचे प्रश्न प्राधान्यानं सोडवा - उद्धव

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळी, शिवडी, काळाचौकीतल्या शाखांना भेट देली. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केलं. जनतेचे प्रश्न, त्यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य द्या, असा आदेश उद्धव यांनी दिला. तसंच प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संघटित होऊन कामं केली पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. या वेळी मोठ्या संख्येनं महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या