मुंबई - 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून पाळला जातो. या निमित्ताने 'मुंबई लाइव्ह'ने सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यावेळी काही तरुणांनी पहिल्यांदाच मतदान करत असल्याने उत्साही असल्याची भावना व्यक्त केली. तसेच काहींनी मतदानाचा हक्क सगळ्यांनीच बजावला पाहिजे असं मतही व्यक्त केलं.
