कार्यकर्त्यांनी 'मनसे' कामाला लागा - राज ठाकरे

माझगाव - बुधवारी सायंकाळी ताडवाडी परिसरातल्या मनसेच्या नवीन कार्यालयाचं उद् घाटन झालं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते हे उद् घाटन झालं. या कार्यक्रमाला मनसे नेते बाळा नांदगावकर, संजय नाईक, प्रभाग क्रमांक 202 च्या नगरसेविका समिता नाईक आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं कामाला जोरदार सुरुवात केलीय. या कार्यक्रमात राज यांनी निवणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. ''जानेवारी महिन्यापासून जोरात कामाला लागायचे आहे. बाकीच्या सर्व पक्षांकडे बक्कळ पैसा आहे. पण आपण ही निवडणूक बिना पैश्याची लढवणार आहोत,'' असं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या